मुले कदाचित त्यांच्या भावना बोलून दाखवणार नाहीत. पण मुलांचे अचानक शांत होणे; अभ्यासातले लक्ष उडणे; भावनांचा अतिरेक होणे; उगीचच रडणे-चिडणे- रागावणे; काही विशिष्ट व्यक्तींना टाळणे; आई-वडिलांच्या मिठीतही अस्वस्थ होणे; आहार, अभ्यास, झोप या सवयीत कमालीचा बदल होणे ही आणि यासारखी काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब सतर्क व्हा आणि काहीतरी वेगळे घडले […]